रत्नागिरीडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
👉 भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी शहरातील धनजी नाका परिसरातील M.S. Naik PRIMARY English medium School मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आरिफा म्हालदार यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचे जीवनकार्य, शिक्षणाचे महत्त्व भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान तसेच समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार आचरणात आणून चांगले नागरिक बनण्याचे आवाहन केले.
तसेच शिक्षकांनीही बाबासाहेबंच्या कार्याची माहिती देत प्रेरणा दिली.”शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या मांडला.
👉 अशा प्रकारे M.S. Naik Primary English medium School मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीसावर्डे : येथील गोविंदराव...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता ८ तासांत

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता ८ तासांत; रुग्णाला आता...