डॉ. राधिका लोटलीकर पाठक या कोकण कन्येचा वैद्यकीय अडव्हांस न्यूरॉलॉजी क्षेत्रात जागतिक...

डॉ. राधिका लोटलीकर पाठक या कोकण कन्येचा वैद्यकीय अडव्हांस न्यूरॉलॉजी क्षेत्रात जागतिक गौरव

डॉ. राधिका लोटलीकर पाठक या कोकण कन्येचा वैद्यकीय अडव्हांस न्यूरॉलॉजी क्षेत्रात जागतिक गौरव /
कोकणकन्येचा जागतिक गौरव
डॉ. राधिका लोटलीकर पाठक यांची वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशनच्या (WSO) संचालक मंडळावर निवड
रत्नागिरी : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील प्रख्यात स्ट्रोक तज्ज्ञ तथा रत्नागिरीतील श्री रामनाथ हॉस्पिटलच्या अॅडव्हान्स्ड स्ट्रोक युनिटच्या संचालिका डॉ. राधिका लोटलीकर पाठक यांची प्रतिष्ठित वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशनच्या (WSO) संचालक मंडळावर (Board of Directors) २०२६ ते २०३० या कालावधीसाठी प्रथमच निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय स्ट्रोक क्षेत्रात भारतासह कोकणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
एम.डी. (MD), डी.एम. (DM-न्युरॉलॉजी) असलेल्या डॉ. राधिका यांनी स्ट्रोक (पक्षाघात) व मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या विकारांवरील (Stroke and Cerebrovascular Disorders) पदव्युत्तर विशेष प्रशिक्षण (Post-Doctoral Fellowship) पूर्ण केले असून, त्यांना स्ट्रोक इंटरव्हेन्शनमधील युरोपियन डिप्लोमा (European Diploma in Stroke Intervention) ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पदवी प्राप्त आहे.
त्या सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तसेच रत्नागिरीतील श्री रामनाथ हॉस्पिटलच्या अॅडव्हान्स्ड स्ट्रोक (पक्षाघात) युनिटच्या संचालिका म्हणून त्या मार्गदर्शन करत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील स्ट्रोक (पक्षाघात) रुग्णांना अत्याधुनिक आणि वेळेवर उपचार सुविधा उपलब्ध होत आहेत.
स्ट्रोक इंटरव्हेन्शन, टेलीस्ट्रोक (Tele-Stroke), मेंदूतील रक्तवाहिन्यांचे विकार (Cerebrovascular Disorders) तसेच जागतिक स्तरावरील स्ट्रोक संशोधन क्षेत्रात डॉ. राधिका यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारताच्या राष्ट्रीय स्ट्रोक कृती आराखड्यात (National Stroke Action Plan 2026) त्या प्रमुख योगदानकर्त्या असून, वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशनच्या फ्युचर स्ट्रोक लीडर्स कार्यक्रमात (Future Stroke Leaders Program) देखील त्यांची निवड झाली होती.
डॉ. राधिका यांची शैक्षणिक कारकीर्दही तितकीच उल्लेखनीय राहिली आहे. रत्नागिरीतून बारावीच्या राज्य मंडळ परीक्षेत त्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. त्यानंतर मुंबईतील के. ई. एम. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस (MBBS) आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.डी. (MD) पदवी संपादन करताना त्यांनी सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. पुढे भारतातील अग्रगण्य न्युरोलॉजी संस्थांपैकी एक असलेल्या श्री चित्रा तिरुनल वैद्यकीय विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेत, तिरुवनंतपुरम येथून त्यांनी डी.एम. (DM) न्युरॉलॉजी ही सुपर स्पेशालिटी पदवी प्राप्त केली.
जागतिक स्ट्रोक उपचार क्षेत्रातील या उल्लेखनीय यशामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण कोकणात आनंद व्यक्त केला जात असून, रत्नागिरीतील श्री रामनाथ हॉस्पिटलच्या अॅडव्हान्स्ड स्ट्रोक (पक्षाघात) युनिटला त्यांच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा लाभ मिळत असल्याने कोकणातील रुग्णांसाठी ही एक अभिमानाची आणि आश्वासक बाब ठरत आहे.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...