तळगाव राणेवाडी, तालुका राजापूर येथे शिमगोत्सव आणि सत्यनारायण महापूजा थाटामाटात संपन्न
मुंबई (शांताराम गुडेकर )
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तळगाव राणेवाडी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे शिमगोत्सव आणि त्या निमित्ताने सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.या प्रसंगी तळगाव राणेवाडी मंडळ, मुंबई व ग्रामस्थ यांच्या अमूल्य सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.मंडळाचे अध्यक्ष दिलीप राणे,
सचिव संतोष शांताराम राणे,कार्याध्यक्ष विश्वास बाळा तेली तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला त्याबद्दल मंडळ मुंबई /ग्रामीण पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक, महिला वर्ग, तरुण -तरुणी आणि लहान मुलं यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
