महाराष्ट्रदत्ता गाडेवर पीडितेचा तो आरोप खोटा, वकिलाने सुप्रीम कोर्टाचा दाखला देऊन थेट...

दत्ता गाडेवर पीडितेचा तो आरोप खोटा, वकिलाने सुप्रीम कोर्टाचा दाखला देऊन थेट सांगितलं!

पुणे : स्वारगेट एसटी बस आगार बलात्कार प्रकरणामुळे आणि आरोपी दत्ता गाडेच्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी दत्ता गाडे याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण दत्ता गाडेच्या वकिलांनी कोर्टामध्ये जो युक्तिवाद केला आहे, त्यात दोन मुख्य मुद्दे मांडले आहेत. घडलेला घटनाक्रम आणि पीडितेनं केलेला आरोप हा जुळत नाही, असा दावा वकिलांनी केला आहे. एवढंच नाहीतर दत्ता गाडे आणि त्याचा भाऊ सेम टू सेम दिसणार आहे, त्यामुळे पोलिसांनी कुणाला पकडलं, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला.*

स्वारगेट एसटी बस आगार प्रकरणाची आता न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. सरकारी वकिलांनी दत्ता गाडेची सगळी कुंडली मांडली. तर आरोपीचे वकील वाजीद पठाण आणि साजीद शहा यांनी मात्र भलताच युक्तिवाद केला.

पीडितेनं आरडाओरड का केला नाही?

“प्रसारमाध्यमाने आरोपीचं चेहरा आधीच उघड केला आहे. मीडियाने खूप मोठा हाईक केला आहे. दत्ता गाडेवर सहा गुन्हे दाखल आहेत. पण एकही गुन्हा अजून सिद्ध झाला नाही. त्याच्यावर असलेल्या केसेस या चोरीच्या आहेत. त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार असं म्हणता येणार नाही. जी पोलीस कोठडी मागितली त्यामुळे १२ मार्चपर्यंत देण्यात आली आहे. जी वेळ घटना घडली ती दिवसाची होती. पीडितेनं कुठे ही आरडाओरडा केला नाही. लोकांना बोलावलं नाही. पोलिसांनी दोनवेळा अत्याचार झाल्याचा उल्लेख केला आहे. पण त्यामध्ये आरडाओरडा करता आला असता, असा युक्तिवाद आम्ही केला आहे, असं दत्ता गाडेचे वकील वाजीद पठाण यांनी युक्तिवाद केल्याचं सांगितलं.

दत्ता आणि त्याचा भाऊ दिसायला सारखाच!

तसंच, १२ मार्च रोजी आता सुनावणी होईल, आम्ही एवढं सुद्धा सांगतो की, या प्रकरणामध्ये पोलिसांनी दत्ताच्या भावाला ताब्यात घेतलं आहे. त्याचा भाऊ हा सेम त्याचा सारखाच दिसतो. आता त्यातला कोण आहे, हे सांगता येणार नाही, हा आमचा पुढील युक्तिवादाचा भाग असणार आहे, असंही पठाण यांनी सांगितलं.

पीडित तरुणी स्वत: दत्तासोबत गेली

तर, त्या दिवशी ही घटना घडली तेव्हा पीडित तरुणीही स्वत: त्याच्यासोबत एसटी बसमध्ये गेली होती. आरोपी गाडेनं आम्हाला सांगितलं की, दोघांच्या सहमतीने संबंध झाले होते. मी बलात्कार केला नाही, आमच्या दोघांच्या सहमतीने संबंध झाले होते, असं आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

तसंच, सुप्रीम कोर्टाची नियमावली आहे, याआधीही अनेक प्रकरणामध्ये असाच युक्तिवाद झाला होता. जर महिलेच्या सहमतीनं संबंध झाले असतील तर तो बलात्काराच्या प्रकरणात येत नाही. या ठिकाणी सुद्धा आरोपी सहमतीने संबंध झाल्याचे सांगत आहे. पण न्यायालयाने पोलिसांना तपासासाठी १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे, असं आरोपीचे वकील साजीद शहा यांनी सांगितलं.

Breaking News