संगमेश्वरदागिन्यापुढे माणुसकी हरली,कडवई येथील 70 वर्षीय वयोवृद्ध बानू जुवळे हिचे अपहरण करून...

दागिन्यापुढे माणुसकी हरली,कडवई येथील 70 वर्षीय वयोवृद्ध बानू जुवळे हिचे अपहरण करून निर्घृण हत्त्या करून अंगावरील दागिने लुटले.

खळबळ उडवून देणाऱ्या घटनेने संगमेश्वर तालुका हादरलंय, एका आरोपीचे मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश फरार दोघांचा तपास सुरु.

संगमेश्वर /एजाज पटेल 

रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे एक धक्कादायक आणि क्रूर घटना घडली आहे.या गावातील बेपत्ता झालेल्या बानू फकीर मोहमद जुवळे या 70 वर्षीय महिलेचे गावातील एक महिला आणि दोन पुरुष व्यक्तींनी तीच्या अंगावरील अवघ्या साडेतीन तोळे  सोन्याचे दागिने बळकवण्या साठी  सिनेस्टाईल अपहरण करून तीचा गळा दाबून निर्दयीपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलातील खोल दरीत फेकून दिला.संगमेश्वर पोलिसांनी वेगाने तपास व चौकशीचे चक्रे फिरवत एका आरोपीचे मुसक्या आवळल्या असून फरार दोन आरोपींचा शोध घेत आहेत. खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेने कडवई गावांसह संपूर्ण संगमेश्वर तालुका हादरलं आहे.

 संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील बानू फकीर मोहमद जुवळे वय वर्ष 70 ही 2 मे 2025 रोजी पासून बेपत्ता असल्याची फिर्याद तीची चुलत सून  मुनीरा बशीर जुवळे कडवई (उभीवाडी )हिने संगमेश्वर पोलीस ठाण्यात 9 मे 2025 रोजी दाखल केली होती.संगमेश्वर पोलिसांनी लापत्ता दाखल करून घेत. वेळ न दवडता वरिष्ठांच्या  मार्गदर्शना खाली वेगाने तपासाची चक्रे फिरवण्यास सुरु केले.

सदर नापत्ता वयोवृद्ध महिला असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार संगमेश्वर पोलिसांनी नापत्ता बानू जुवळे या वयोवृद्ध महिलेचा तपास करण्याच्या दृष्टीने वेगाने व कसून शोध घेण्यासाठी सुरुवात केली. या कामी त्यांना मोबाईल नंबर चे  तांत्रिक विश्लेषण आणि सी. सी. टीव्ही फुटेज ची चांगली मदत मिळाली.
हाजिरा मुसा माखजनकर, रिजवान महामूद जुवळे दोन्ही राहणार कडवई (उभीवाडी), तसेच हुमायू शकील काजी राहणार फणसवणे या तिघांनी  2 मे रोजी MH 05 AX 9098 या क्रमांकाच्या नॅनो गाडीतून बानू जुवळे यांना नेत असल्याचे  सी. सी. टीव्ही फुटेज मध्ये दिसून आल्याने .मुनीरा जुवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बानू जुवळे याचे अपहरण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले त्यावरून  संगमेश्वर पोलीस ठाणे गुन्हा. रजि. नं  77/2025 बी.एन.एस कलम 140(3).3 (5) प्रमाणे दि. 19 मे 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 

 आरोपी कडून अपहरण आणि खुनाची कबुली 

या गुन्ह्यातील आरोपी  रिजवान महामूद जुवळे हा सीवुड मुंबई येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाल्या वरून संगमेश्वर पोलिसांच्या विशेष पथकाने त्या ठिकाणी जाऊन मोठ्या शिताफिने त्याच्या मुसक्या आवळून संगमेश्वर पोलीस ठाणे येथे आणले.आरोपी रिजवान जुवळे याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने पोलिसांनी सखोल तपास केले असता आरोपी रिजवान महामुद जुवळे याने गुन्ह्याची कबुली देताना  हुमायु शकील काझी व हाजीरा मुसा माखजनकर या तिघांनी मिळून एकमेकाचे संगनमताने बानु फकीर मोहंमद जुवळे हिचे अपहरण केल्याचे कबूल करत हिमायू काझी आणि रिजवान जुवळे या दोघां  नरामधानी क्रूरतेची परीसीमा गाठत तीचा गळा आवळून ठार मारून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतल्याचे कबुलीत सांगितले.

त्या नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बानू जुवळे हिचा  मृतदेह अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या नॅनो गाडीतून कडवई ते कुंभारखणी बुद्रुककडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला खिंडीतील जंगलमय भागात खोल दरीत फेकून दिल्याचे आरोपी रिजवान जुवळे याने कबूली  देत 23 मे रोजी पोलीस कस्टडी दरम्यान वरील घटनास्थळी अपहरण करून ठार मारण्यात आलेल्या बानू जुवळे याचे प्रेत प्रत्यक्षपने पोलिसांना दाखवले.

पोलिसांनी दागिने केले जप्त

30 ग्राम 450 मिली दागिण्याच्या आमिषाने 70 वर्षीय वयोवृद्ध बानू जुवळे या महिलेचा नाहक  बळी घेतला. ते दागिने ज्या सोनाराला विकले होते. ते दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहे.    

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक  रत्नागिरी, शंकर नागरगोजे पोलीस उपनिरीक्षक संगमेश्वर, चंद्रकांत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक, प्रशांत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक,सचिन कामेरकर, पोहेकॉ, विनय मनवल, पोहेकॉ /१२७३,.विश्वास बरगाले, पोहेकॉ,दिपराज पाटील, पोहेकॉ, रत्नागिरी, विवेक रसाळ, पोहेकॉ रत्नागिरी. सोमनाथ आव्हाड, पोकॉ संगमेश्वर, बाबुराव खोंदल, संगमेश्वर पोलीस ठाणे यांनी यादस्वीपणे पार पाडली.

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...