महाराष्ट्रदिनांक 2 ते 6 डिसेंबर 2025 दरम्यान मालदीवज येथे संपन्न झालेल्या 7...

दिनांक 2 ते 6 डिसेंबर 2025 दरम्यान मालदीवज येथे संपन्न झालेल्या 7 व्या विश्व् कप कॅरम स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली असून 7 गोल्ड, 4 सिल्वर व 3 ब्रॉन्झ मेडल्स पटकवली आहेत.

दिनांक 2 ते 6 डिसेंबर 2025 दरम्यान मालदीवज येथे संपन्न झालेल्या 7 व्या विश्व् कप कॅरम स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली असून 7 गोल्ड, 4 सिल्वर व 3 ब्रॉन्झ मेडल्स पटकवली आहेत. या संघात 8 पैकी निम्मे म्हणजेच 4 खेळाडू महाराष्ट्रातील होते हि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनसाठी अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेतील माजी स्विस लीग विजेती काजल कुमारीने सांघिक गटात 1 गोल्ड, दुहेरी गटात 1 गोल्ड व एकेरी गटात 1 सिल्वर मेडल पटकवले आहे. हि आज रात्री 9.30 वाजता एअर इंडिया ( AI 2977 ) या विमानाने मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळावर ( T2 ) पोहोचत आहे. तर तिसऱ्यांदा विश्व् स्तरावर आपला झेंडा रोवणारा माजी विश्व् विजेता प्रशांत मोरे याने या स्पर्धेत सांघिक व एकेरी गटात मिळून 2 गोल्ड मेडल्स व दुहेरी गटात 1 सिल्वर मेडल अशी कमाई केली आहे. माजी विश्व् कप विजेत्या संदीप दिवेने सांघिक गटात 1 गोल्ड व दुहेरी गटात 1 सिल्वर मेडल मिळवले आहे. तर अभिजित त्रिपणकरने सांघिक व दुहेरी गटात मिळून 2 गोल्ड मेडल्स व एकेरी गटात 1 ब्रॉन्झ मेडल पटकवले आहे.

Breaking News