दिनांक 8 /5 /2025 रोजी मौजे पुनस ता लांजा जिल्हा रत्नागिरी येथील संसारी तिठा नजीक डांबरी रस्त्यावरती वन्यप्राणी बिबट्याचे पिल्लू असले बाबतची माहिती मिळताच तात्काळ वनविभागाचे अधिकारी वनपाल लांजा वनरक्षक लांजा वनरक्षक कोर्ले घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्या ठिकाणी एक महिन्याचे बिबट वन्य प्राण्याचे लहान पिल्लू (नर) दिसून आले . सदर ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांचा जमाव जमलेला असल्याने व सदर बिबट्याचे पिल्लू हे थोड अशक्त दिसत असल्याने वन अधिकारी यांनी पिल्लास ताब्यात घेतले. त्यानंतर मा विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळून गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी प्रियांका लगड यांना सदर घटनेची माहिती दिली. व त्यांच्या मार्गदर्शनानुसार बिबट्याचे पिल्लू त्याच परिसरात जंगलमय भागामध्ये बिबट्याच्या पिल्लाला आईबरोबर पुर्नभेटीकरिता ठेवण्यात आले. परंतू बिबट्याच्या आईची भेट झाली नाही तसेच दिनांक 9/6/ 2025 रोजी मा विभागीय वन अधिकारी रत्नागिरी यांचे सुचने प्रमाणे डॉ. श्री निखिल बनगर पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव सातारा वनविभाग व सह्याद्री व्याघ्र यांना पाचारण केले. श्री. डॉ. बनगर हे लांजा येथे येऊन बिबट्याच्या पिल्लाची प्राथमिक तपासणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी बिबट्याचे पिल्लू सापडले त्या परिसराची पाहणी करून बिबट पिल्लू व आईची पुनर्भेट होण्याकरता अनुकूल जागा निवडण्यात आली व बिबट्याचे पिल्लू कॅमेराच्या निगराणीखाली सदर ठिकाणी ठेवण्यात आले. परंतु पिल्लाची पुनर्भेट झाली नाही पुन्हा दिनांक 10/6/2025 रोजी बिबट्याचे पिल्लू व आईची पुनर्भेट होण्याकरता ठेवले असता त्यांची पुनर्भेट न झाल्याचे दिसून आले. परंतु त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेरा मध्ये दिनांक 10/ 6 /2025 रोजी रात्री दोन वेळा बिबट मादी पिल्ला जवळ येऊन गेल्याचे छायाचित्र कॅमेरा मध्ये संकलित झाले होते. त्यानंतर डॉक्टर श्री निखिल बनगर यांचे निगराणीखाली बिबट्याचे पिल्लाला ठेवणेत आले. वातावरणातील बदलामुळे व पाऊस असल्याने तसेच बिबट्याच्या पिल्लाच्या आरोग्याला धोका पोहोचू नये याकरिता बिबट्याचे पिल्लास त्याचे आईची पुनर्भेटी करिता पुन्हा पिल्लू मिळालेल्या परिसरात ठेवण्यात आले परंतु आई व पिल्लाची पुनर्भेट झाली नाही. शासकीय विश्रामगृह लांजा येथे सदर बिबट च्या पिल्लास सुस्थितीतडॉक्टर श्री निखिल बनगर यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. वनरक्षक कोरले श्रीम. श्रावणी पवार वनरक्षक लांजा श्रीमती नमिता कांबळे वनपाल लांजा श्री सारिक फकीर असे सर्वजण पिल्लाची देखरेख करत होते डॉक्टर निखिल बनगर यांचे सूचनेप्रमाणे बिबट पिल्लास फीडिंग करणे त्यांचे सूचनेप्रमाणे दिवसातून चार वेळा फीडिंग करणे देखरेख करणे त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवणे याप्रमाणे 24 तास बिबट्याचे पिल्लू निगराणी खाली होते. बिबट्याच्या पिल्लास लागणारी खाद्य पावडर ही कोल्हापूर मिरज या ठिकाणाहून तात्काळ उपलब्ध करून देण्याचे काम वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी श्री.प्रकाश सुतार हे करत होते व वेळोवेळी लांजा शासकीय विश्रामगृह येथे येऊन बिबट्या पिल्लाची पाहणी व चौकशी करून त्यावर निगराणी ठेवत होते. बिबट्याचे पिल्लू हे दिनांक 8/6/2025 ते 2/6/2025 असे एकूण 25 दिवस वनविभागाच्या अखत्यारीत डॉक्टर निखिल बनगर यांच्या निगराणीखाली सुस्थितीत ठेवण्यात आले. पिल्लाच्या आईचा शोध घेणे करिता वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.प्रकाश सुतार यांनी विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर येथे संपर्क साधून कोल्हापूर वनविभागाची थर्मल ड्रोन द्वारे तपासणी करणारी टीम बोलावून घेतली. टीमने मौजे पुनस येथे ज्या ठिकाणी पिल्लू मिळाले होते त्या ठिकाणी थर्मल ड्रोन द्वारे दिवसाची व रात्रीची तपासणी केली परंतु त्यामध्ये बिबट्या आई दिसून आली नाही. अशा प्रकारे वनविभाग रत्नागिरी मार्फत बिबट्या पिल्लू व त्याच्या आईची पुनर्भेट करण्याकरिता प्रयत्न सुरू होते. सदर पिल्लाची देखरेख करताना त्याला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेणेत येत होती. त्याकरिता पिल्लाला हाताळताना हातात हॅन्ड ग्लोज घालणे पाणी गरम करून घेणे सर्व उपकरणे गरम पाण्याने धुऊन घेणे पिल्लाला ज्या रूममध्ये ठेवले होते तो रूम स्वच्छ ठेवणे. याप्रमाणे पिल्लाची देखरेख वन अधिकारी करत होते. डॉक्टर निखिल बनगर हे 24 तास पिल्लाची देखरेख करत होते. पिल्लाला संसर्ग होऊ नये याकरिता पिल्लाला पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यात येत होते त्याला झोपण्याकरिता प्लास्टिक टप वेळोवेळी स्वच्छ करून वापरणेत येत असे . दरम्यान च्या कालावधीत आमदार किरण सामंत यांनी शासकीय विश्रामगृह लांजा या ठिकाणी भेट देऊन बिबट पिल्ला बाबत माहिती घेतली
त्यानंतर मा विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण यांचे प्रयत्नाने सदर पिल्लास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली मुंबई या ठिकाणी संगोपणाकरिता परवानगी घेण्यात आली. दिनांक 2/7/2025 रोजी शासकीय वाहनाने बिबट्याचे पिल्लास वनपाल लांजा सारीक फकीर व डॉक्टर निखिल बनकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथे पुढील संगोपणाकरिता वन अधिकारी व डॉक्टर विनया जंगले यांच्याकडे सुपूर्त केले. बिबट्याचे पिल्लू सुपूर्त करताना बिबट्याचे तापमान वजन पिल्लू सुस्थितीत होते . बिबट्याचे पिल्लू एकूण 25 दिवस वनविभागाच्या अखत्यारीत डॉक्टर निखिल बनगर यांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री प्रकाश सुतार वनपाल लांजा ही सारीक फकीर वनरक्षक कोरले श्रीम श्रावणी पवार वनरक्षक लांजा श्रीमती नमिता कांबळे यांनी पिल्लाची 25 दिवस अहोरात्र देखरेख केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री.बिडकर यांनी शासकीय विश्रामगृह लांजा मधील रूमची सोय केली खानसामा श्री फोंडेकर .श्री.राप यांनी वेळोवेळी आवश्यक मदत केली याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग लांजा अधिकारी यांचे बिबट्याचे संगोपनावेळी मोलाचे सहकार्य मिळाले. वन्यप्राणी बिबट पिल्लाची निगराणी ही मा. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई मॅडम, मा. सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड मॅडम , त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती वन्यजीव कोठे अडचणीत सापडल्यास किंवा अशा प्रकाराची घटना घडल्यास वन विभागाचा टोल क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मा विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळून गिरिजा देसाई यांनी केले आहे
दिनांक 8 /5 /2025 रोजी मौजे पुनस ता लांजा जिल्हा रत्नागिरी येथील संसारी तिठा नजीक डांबरी रस्त्यावरती वन्यप्राणी बिबट्याचे पिल्लू असले बाबतची माहिती मिळताच तात्काळ वनविभागाचे अधिकारी वनपाल लांजा वनरक्षक लांजा वनरक्षक कोर्ले घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्या ठिकाणी एक महिन्याचे बिबट वन्य प्राण्याचे लहान पिल्लू (नर) दिसून आले .
