रत्नागिरीदेवरुख जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत गणराज क्लबचा दबदबा ५ सुवर्ण, ४ रौप्य,...

देवरुख जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत गणराज क्लबचा दबदबा ५ सुवर्ण, ४ रौप्य, २ कांस्य पदकांची कमाई

देवरुख जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत गणराज क्लबचा दबदबा ५ सुवर्ण, ४ रौप्य, २ कांस्य पदकांची कमाई; बरखा संदे २०२६ या वर्षी ‘बेस्ट फायटर’ किताब

रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी आणि नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ जुलैदरम्यान देवरुख येथील ओमेगा गार्डन हॉलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्युरोगी व पूमसे स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील अधिकृत गणराज क्लबच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण ११ पदकांची कमाई केली.


रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. रत्नागिरी तालुक्यातून गणराज क्लब मधून २० खेळाडूंनी विविध गटांत आपले कौशल्य सिद्ध केले. विशेष म्हणजे २०२६ चा या वर्षी सब ज्युनिअर गटा मध्ये बरखा संदे हिने ‘बेस्ट फायटरचा’ किताब पटकावत गणराज क्लब ची मान उंचावली.
सुवर्णपदक विजेते खेळाडू : या स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य दाखवत विधी पूजा विवेकुमार दुबे, बरखा तरन्नूम सर्फराज संदे , गौरी सारिका अभिजीत विलंणकर, त्रिशा साक्षी सचिन मयेकर, केशर कनिष्क कुणाल शेरे, यांनी सुवर्णपदके पटकावली.
रौप्यपदक विजेते : अहाना आशका आशिष रसाळ, तीर्था आराध्या प्रशांत मकवाना, केशर कनिष्क कुणाल शेरे,
कांस्यपदक विजेते : दुर्वा मानसी मंदार हातिसकर, युबना तरन्नूम सर्फराज संदे,
याशिवाय नीरज आराध्या प्रशांत मकवाना, ध्रुवी सृष्टी साष्टांग मयेकर, विहान नीता मिलिंद साप्ते, आद्य आशका आशिष रसाळ, स्पर्श रीना किरण रेडीज, शार्वी ऋतिका महेश महाजन, यांनीही स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदविला.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश रावकर सचिव लक्ष्मण के, खजिनदार शशांक घडशी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या खेळाडूंना प्रमुख मार्गदर्शन करणे प्रमुख प्रशिक्षक सौ आराध्या प्रशांत मकवाना, यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
गणराज क्लबचा खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे, नगराध्यक्ष सौ शिल्पा ताई सुर्वे, नगरसेवक सौ पूजा ताई पोवार, क्लब अध्यक्ष वकील सौ. पूजा प्रसाद शेट्ये, उपाध्यक्ष सौ. साक्षी मयेकर, सचिव रंजना मोंडुला, सदस्य परेश मोंडुला, स्नेहा मोरे, शलाका जावकर, क्रीडाप्रेमी, पालक आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धांसाठीही त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...