रत्नागिरीदेशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पने तून तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीयुत...

देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पने तून तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीयुत रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भा.ज.पा. रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चा यांच्या वतीने आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या संकल्पनेवर आधारित महिलांच्या बचत गटांचे तालुका स्तरीय संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले

देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पने तून तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीयुत रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भा.ज.पा. रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चा यांच्या वतीने आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या संकल्पनेवर आधारित महिलांच्या बचत गटांचे तालुका स्तरीय संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले. या संमेलनामध्ये विविध बचत गटांच्या कार्यकर्त्या तसेच सीआरपी प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

संमेलनात महिलांच्या उद्योगांना चालना मिळावी, स्थानिक स्वदेशी उत्पादनांचे उत्पादन आणि विपणन वाढावे, महिलांनी स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहावे यासाठी मार्गदर्शन आणि माहिती देण्यात आली. विविध विषयांवर तज्ज्ञांनी महिलांना सूचना दिल्या.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वदेशीचा प्रसार’ या सूचनेचे महत्त्व अधोरेखित केले. स्थानिक उत्पादनांचा वापर करा, स्थानिक महिलांच्या हाताला काम द्या आणि घरगुती व्यवसायांना व्यासपीठ द्या, हेच आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाचे नियोजन मध्यमंडल तालुकाअध्यक्ष सुचिता नाचणकर अनुष्का शेलार यांनी केले यावेळी अनुश्री आपटे नुपुरा मुळे , शिवानी रेमुलकर, शुभांगी घाणेकर, सायली केतकर, मंदा ठीक, मेधा देवस्थळी, केतकी केळुसकर, नम्रता इंगवले, वैभवी पालेकर, अश्विनी शेलार, मंजिरी चव्हाण आणि यांसह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या

संमेलनाच्या शेवटी महिलांच्या प्रगतीसाठी स्वदेशी, उद्योजकता आणि बचत गटांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. महिलांनी उत्साहाने मार्गदर्शनाचा लाभ घेत पुढील कार्ययोजनांवर चर्चा केली.

Breaking News

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद-- अमरावती, मेळघाट संघर्ष यात्रेच्या...

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरास्त्री...