Modal title

कोकणदोडामार्ग येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून तातडीने दखल.

दोडामार्ग येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून तातडीने दखल.

दोडामार्ग- तिलारी भागात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, तातडीने अहवाल पाठवा
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना–

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानाची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने दखल घेतली आहे संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा व तातडीने अहवाल शासनाकडे पाठवून द्या अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत.
रविवारी सायंकाळी तिलारी परिसरात गारपीट आणि वादळी पाऊस झाला या पावसात केळीच्या बागा काजूच्या बागा मोडून पडल्या. या नुकसानी नंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला. त्यांना या संदर्भात शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्या पंचनामांचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Breaking News