रत्नागिरीध्यास महिला सक्षमी करणाचा, ध्यास कोकणच्या सर्वांगीण विकासाचा

ध्यास महिला सक्षमी करणाचा, ध्यास कोकणच्या सर्वांगीण विकासाचा

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे, रत्नागिरी, वाटद खंडाळा विभाग प्रमुख श्री दीपक सांबरे , यांची रत्नसिंधू न्यूज मिडिया च्या संस्थापिका / संपादक वर्षा राजे निंबाळकर यांनी वाटद खंडाळा येथील कार्यालयात भेट घेतली.

संस्थापक / अध्यक्ष, श्री निलेशजी भगवान सांबरे, साहेब यांची जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र, ही “कोकणचा सर्वांगीण विकास हाच जिजाऊचा ध्यास” या संकल्पनेवर कार्यरत आहे.

मोफत वैदकीय सेवा, शिक्षण सेवा, करियर विकास सेवा, कृषी सुविधा, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण या विविध घटकांवर कार्यरत असलेल्या या संस्थेने, गावो गावातील जनते पर्यंत ह्या सुविधा पोचाव्यात ह्या साठी वाटद, खंडाळा येथे कार्यालय चालू केले आहे.

“गाव तिथे रोजगार” ह्या संकल्पने अंतर्गत महिला सक्षमीकरण आणि महिलांसाठी मोफत प्रशिक्षण राबवण्यासाठी कार्यरत असलेल्या वर्षा राजे निंबाळकर यांनी कार्यालयास भेट देऊन महिला सक्षम झाल्या तर परिवार सक्षम होईल आणि त्यामुळे समाज सक्षम बनेल या सामाईक संकल्पनेवर चर्चा केली.

जिजाऊ संस्थे तर्फे केलेल्या आगामी काळात वाटद, खंडाळा विभागामध्ये महिला सक्षमीकरणा अंतर्गत महिलांसाठी मोफत शिलाई मशिन प्रशिक्षण केंद्र चालू करण्यात येत आहे. ह्या कार्यात सहभाग घेऊन जास्तीत जास्त महिलांना याची माहिती मिळेल यासाठी वर्षा राजे निंबाळकर यांनी पुढाकार घेतला आहे.

गेली १८, १९ वर्षे जिजाऊ संस्था महिला सक्षमीकरणा संदर्भात कार्यरत आहे.
शिलाई मशीन क्लासेस, आरी वर्क, ब्युटी पार्लर, रांगोळी यासारखे अनेक उपक्रमांचा मोफत मार्गदर्शन देऊन महिलांना व्यवसायाभिमुख बनविण्याचं काम जिजाऊ संस्था करते.

Breaking News

साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राउंड येथील कचऱ्याला सातत्याने लागण्याऱ्या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवावे

नगरसेविका पूजा पवार यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील...

भागोजीशेठ कीर जयंती निमित्त रत्नागिरीत काढण्यात आली भव्य रॅली

भागोजीशेठ कीर जयंती निमित्त रत्नागिरीत काढण्यात आली भव्य रॅली-...