रत्नागिरीनगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025जिल्हास्तरीय संनियत्रण समितीची बैठक

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025जिल्हास्तरीय संनियत्रण समितीची बैठक

रत्नागिरी, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रि‍क निवडणूक 2025 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज जिल्हास्तरीय संनियत्रण समितीची बैठक घेतली.
बैठकीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, प्रांताधिकारी जीवन देसाई, आकाश लिगाडे, मुख्याधिकारी वैभव गारवे, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रंविद बिरादार, तहसिलदार प्रियांका ढोळे, अमृता साबळे आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. मतदान केंद्रांमध्ये किमान पायाभूत सुविधा असल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भर द्यावा. प्रिंटींग प्रेसमालकांना प्रकाशकाचे नाव, संख्या छपाईबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूचना द्यावी. सर्व परवानग्या एकत्रितरित्या मिळण्यासाठी नगरपरिषद/नगरपंचायतमध्ये एक खिडकी राबवावी. तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा. भरारी पथक निर्माण करुन तपासणी नाक्यांवर तैनात कराव्यात, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांनी दिल्या.

Breaking News

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद-- अमरावती, मेळघाट संघर्ष यात्रेच्या...

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरास्त्री...