रत्नागिरीनवलाई पावणाई जाकादेवी आंबेशेत संघाचा ढोल - ताशा ठरला सरस--

नवलाई पावणाई जाकादेवी आंबेशेत संघाचा ढोल – ताशा ठरला सरस–

संघाचा ढोल वादन स्पर्धेत प्रथम क्रमांक

सध्या सर्व कोकण पट्ट्यात शिमग्याचा उत्साह पाहायला मिळतो आहेयाचेच औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील श्री लक्ष्मीकेशव उत्सव मंडळ पुरस्कृत भव्य ढोलवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते


आपल्या विजयाची घौडदौड कायम ठेवत नवलाई पावणाई जाकादेवी आंबेशेत संघाने ढोल वादन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विशेष बाब म्हणजे सलग तीन वर्षे या संघाने आपल्या नवनवीन प्रयोगांच्या जोरावर ढोल वादनात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
उत्कृष्ट आणि आकर्षक वेशभूषा व लयबद्ध ढोल वादनाने या संघाने क्रमांक पटकावला. या स्पर्धेत या संघाला ७७७७ रुपये रोख रक्कम आणि भव्य चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच लक्षवेधी बाब म्हणजे उत्कृष्ट ताशावादक म्हणून स्मित बोरकर आणि उत्कृष्ट ढोलवादक पार्थ मयेकर यांना पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत संघातील वादक आणि कलाकारांनी महाकाल आधारित वेशभूषा साकारली होती. या संघाने वेशभूषेचा डोलारा सांभाळत मनाला तल्लीन करणारे ढोल वादन केल्याने उपस्थितांची वाहवा मिळवली.*
दरवर्षी काही नवीन कल्पना अंमलात आणण्याचा या संघाचा प्रयत्न असतो. या संघाचे प्रमुख मालक प्रफुल्ल वायंगणकर यांच्या प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाने हा संघ तालुका जिल्हा स्तरावरील विविध ढोल वादन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यशाला गवसणी घालत असतो. विशेषतः आंबेशेत गावात देखील या संघाने विविध सादरीकरणे केलेली आहे. या संघात ऋषिकेश नागवेकर,स्मित बोरकर,आर्यन वायंगणकर, आयुष घोसाळे, पार्थ मयेकर, अथर्व नाचणकर, रुपेश चव्हाण,शौर्य नाचणकर, तर मुख्य वेशभूषा कलाकार म्हणून वेदांत घोसाळे, सिद्धांत सावंत यांचा समावेश आहे. दरम्यान या संघाने मिळवलेल्या नेत्रदीपक यशामुळे संघाचे आंबेशेतकरांकडून विशेष कौतुक होत आहे. शिवाय या यशस्वी कामगिरीमुळे आंबेशेत गावाचे नाव जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर पोहोचले आहे.

Breaking News