महाराष्ट्रनागपूरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; अनेक भागांत संचारबंदी!

नागपूरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; अनेक भागांत संचारबंदी!

नागपूर : नागपूरात औरंगजेब याच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावावा आवरताना पोलिस आणि नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आता पोलिसांना दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले असून उपराजधानी नागपुरच्या महाल परिसरात कोबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे.*

दरम्यान, या घटनेनंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

राज्यात ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अचानक औरंगजेबाची कबर काढण्यासंदर्भात राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी वक्तव्ये केली होती. त्यावरुन राजकारण सुरु असताना काल (दि. १७) नागपूरात विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढला होता. या मोर्चात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. त्यानंतर तणाव निर्माण झाला होता.

त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा तणाव निवळला. परंतू सायंकाळी पुन्हा दोन गटात महाल परिसरात दगडफेक सरु करण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूंनी दगडांचा मारा करण्यात आला. पोलिसांनी यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी जमावाने दोन जेसीबी जाळण्यात आल्या. या दगडफेकीत १० ते १५ पोलिसही जखमी झाले आहेत.

हंसपुरी भागातही 20 ते 22 वाहनांची तोडफोड

नागपूरच्या महाल परिसरानंतर हंसपुरी भागातही तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. या भागात 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी सकाळी 10 वाजता नागपूर येथे येत असून, ते महाल भागातील पाहणी करणार आहेत. प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद करतील. मीडियाशी संवाद साधतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शांततेचे आवाहन

या प्रकारानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेच आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावे. आपण सातत्याने पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुख:त सहभागी होणारे शहर आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.

Breaking News