Uncategorizedनागरी आरोग्य केंद्र कोकणनगर रत्नागिरी येथे जागतिक कर्करोग दिन व जन गणजागृती...

नागरी आरोग्य केंद्र कोकणनगर रत्नागिरी येथे जागतिक कर्करोग दिन व जन गणजागृती मोहीमेचे जिल्हास्तरीय उदघाट्न संपन्न…


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी आरोग्य केंद्र कोकण नगर रत्नागिरी येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक कर्करोग दिन तथा कर्करोग तपासणी व जनजागृती कार्यक्रमाचे जिल्हा स्तरीय उदघाट्न झाले.कर्करोगाची लक्षणे,कारणे व उपचार याबाबत माहिती देऊन आरोग्य विभागाकडून या मोहिमेच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर कर्करोग जनजागृती होणे गरजेचे आहे असे डॉ महेंद्र गावडे यांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेश्वरी सातव,जिल्हा माध्यम अधिकारी एन जी बेंडकुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.रमन, राष्ट्रीय असांसर्गिक आजार नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ.यश प्रसादे,पर्यवेक्षक कल्याण बिराजदार,आरोग्य सहाय्यक चेतन शेटे व सर्व आरोग्य कर्मचारी,आशा व नागरिक उपस्थित होते.
आपल्या मनोगतातुन बोलताना यश प्रसादे यांनी कर्करोग मोहिमे बद्दल तसेच डॉ शिरसाट,डॉ सातव,डॉ. रमन यांनी कर्करोग आजार व जनजागृती बाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.
(डॉ. अनिरुद्ध आठल्ये )
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद रत्नागिरी

Breaking News