रत्नागिरीनारळी पौर्णिमानिमित्त शुक्रवारी स्थानिक सुट्टी

नारळी पौर्णिमानिमित्त शुक्रवारी स्थानिक सुट्टी

रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) :- रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त 3 सार्वजनिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी 8 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
त्याबरोबरच ज्येष्ठा गौरी विसर्जन निमित्ताने 2 सप्टेंबर रोजी आणि नरक चतुर्दशी (अभ्यंगस्थान) निमित्ताने 20 ऑक्टोबर रोजी देखील स्थानिक सुट्टयांचे दिवस म्हणून रत्नागिरी जिल्हा महसूल हद्दीकरिता जाहीर केले आहेत. याबाबता सन 2025 साठी स्थानिक सुट्टयांची अधिसूचना 7 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...