नाशिक येथे संपन्न झालेल्या विश्व साहित्य संमेलनाला उपस्थित रहाण्याचा योग आला. अत्यंत भव्य , शाही थाटात या ४ थ्या विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन केटीएचएम महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात करण्यात आले होते.अशी माहिती अभिजीत हेग शेट्ये यांनी दिली आहे
संमेलनाचा पहिला दिवस मराठी बोली भाषेच्या उद्घाटनाने सजला यांत पद्मश्री मधुमंगेश कर्णिक, डॅा. सदानंद मोरे, डॅा. मिलींद जोशी, श्रीपाद भालचंद्र जोशी यांची मांडणीने संमेलन सुरु झाले.
संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री . सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. संपुर्ण संमेलनातील नियोजन , कल्पकता विविध साहित्य प्रवाहांची दखल वारकरी संप्रदायाचा विशेष सन्मान , साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार , पुरस्कार, सन्मान या सर्व नियोजनावर भाषा मंत्री ना. उदय सामंत यांचा जबरदस्त प्रभाव जाणव होता. निवृत्ती नाथांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी यावेळी ५० लाखांचा चेक मुख्यमंत्री यांचे हस्ते देण्यात आला. मराठी भाषा भवनाच्या वेगाने सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. एकावर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर ७५ मराठी भाषा मंच तयार करण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी परदेशातील अनेक देशातून साहित्यिक, साहित्य रसिक आले होते.
या दोन दिवसांत मधुभाईं सोबत गप्पांची मैफल अनुभवता आली. माहिमची खाडी, भाकरी आणि फुल , कोकणी ग वस्ती, करुळचा मुलगा यांतील अनेक पात्रे , व्यक्तिमत्त्व भाईंना कोठे कशी भेटत रहातात याचे किस्से त्यांच्याकडून लाइव्ह ऐकण्याचे भाग्य लाभले. वयाच्या ९६ व्या वर्षी भन्नाट उत्साह , तल्लख बुध्दिमत्ता आणि अफाट स्मरणशक्ती चा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक वाक्यातून मिळत रहातो.
याच सोहळ्यात अ.भा.म. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांची भेट झाली. त्यांच्या बडोदा साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणाचा प्रभाव होताच नुकताच त्यांचा शब्द मधील सिनेक्षेत्रातील विशेष व्यक्तिमत्व गुरुदत्त वरील लेख वाचला होता.
महात्मा फुले द्विजन्म शताब्दी आणि चवदार तळे सत्याग्रहाची शताब्दी वर्ष निमित्ताने हे वर्ष विषमाता निर्मूलन निर्धार वर्ष म्हणून साजरे करणार असल्याचा विविध संघटनांचा उपक्रम त्यांनी सांगितला . साहित्यिक सह सामाजिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या देशमुख सरांची भेट वैचारिक चालना देणारी होती.
साहित्य सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष डॅा. प्रदीप ढवळ यांचा अफाट संम्पर्क यांतून अनेकांच्या भेटी झाल्या. विश्वसंमेलनाच्या आयोजनातील धावपळ , कल्पकता, नियोजन याचा अनुभव जवळून पाहण्याची संधी मिळणे माझ्यासाठी फार मोलाचे होते. रत्नागिरीकर माझा एमएचा वर्गमित्र जयू भाटकर यांची भेट विशेष आनंद देणारी होती.
