रत्नागिरीच्या मातीत घडणाऱ्या आणि भविष्यात देशाचं नेतृत्व करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते. त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जिजाऊ संस्थेच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी निलेशजी आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन केलं.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं की, रत्नागिरी जिल्ह्याच्या मातीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, साने गुरुजी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा आहे. आणि म्हणूनच शिक्षण ही फक्त पुस्तकापुरती मर्यादित नसून, ती विचारांची तलवार आहे – जी योग्य धार दिल्यास समाजात क्रांती घडवू शकते. मी बाबासाहेबांचं “महामानव” हे पुस्तक दाखवत संघर्ष म्हणजे काय, ते समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेबांचा प्रवास वाचायलाच हवा अस वक्तव्यमा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केलं.
आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून NASAमध्ये जाणारे विद्यार्थी तयार होतात – कारण येथे शिक्षणाची भूक आहे आणि ती भागवण्यासाठी सरकार, पालक, शिक्षक आणि संस्था एकत्र येत आहेत. आज मुलांच्या हातात मोबाईल आहे, पण तो किती वेळ शिक्षणासाठी वापरतोय, हे ठरवणं आपल्यावर आहे.
अमली पदार्थ, वाईट संगत यापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी आणि शासनाने एकत्र पाऊल टाकावं लागेल. पालकमंत्री म्हणून यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याच मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं.
🏥 शासकीय मेडिकल कॉलेजमुळे आता आपल्या शेतकऱ्याच्या मुलालाही डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकार करता येईल. ही माझी जबाबदारी होती आणि ती मी पूर्ण केली. शिक्षण हे तलवार आहे, आणि तिचं धार आपल्याच हातात आहे. रत्नागिरीच्या मातीतून उद्या एक टिळक, एक बाबासाहेब नक्कीच घडेल – फक्त गरज आहे मेहनतीची, संघर्षाची, आणि योग्य मार्गदर्शनाची; असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.
याप्रसंगी शिवसेना पक्षाचे उपनेते, जिजाऊ संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष निलेशजी सांभरे, यांसह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हजारोंच्या संख्येने विद्यार्थी मित्र या कार्यक्रमाला उपस्थित होते.