रत्नागिरीना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते बसणी येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटन...

ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते बसणी येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटन संपन्न—

रत्नागिरी तालुक्यातील मौजे बसणी गावामध्ये गावणे तळ्याचे सुशोभीकरण व संवर्धन, तसेच इतर विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते पार पडले.
आता पर्यंत या गावात ₹95,58,068 इतका निधी या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आला असून, या कामांचा प्रारंभ करत गावाच्या विकास वाटचालीत एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले. गावाच्या विकासासाठी मिळालेला हा निधी निश्चितच परिवर्तन घडवून आणेल आणि ग्रामस्थांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला .
या प्रसंगी प्रभारी सरपंच किशोर नेवरेकर, सदस्य सुमित राणे, मयेकर मॅडम, बबन शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष चंदन बसणकर, शाखाप्रमुख सुरेश गावडे, सुहास पेटकर, मिलिंद पारकर, माजी सरपंच सारिका मांडवकर, सुनील झगडे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News