रत्नागिरी, दि. 28 (जिमाका):- पंचायत समिती सभापती/उपसभापती पदासाठी निवडणूक ९ मार्च २०२६ रोजी होणार आहे.
जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण खालीलप्रमाणे आहे. मंडणगड-सर्वसाधारण महिला, दापोली-नागरिकांचा मागास वर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह), खेड-सर्वसाधारण महिलांसाठी, चिपळूण-सर्वसाधारण (अनारक्षित), गुहागर-सर्वसाधारण (अनारक्षित)
रत्नागिरी-सर्वसाधारण (अनारक्षित), संगमेश्वर-सर्वसाधारण महिलांसाठी, लांजा-सर्वसाधारण महिलांसाठी, राजापूर-नागरिकांचा मागास वर्गाचा प्रवर्ग (महिला) (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विश्वजीत गाताडे यांनी कळविले आहे.
