पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या शुभ हस्ते प्रतिष्ठेचा सन्मान पुरस्कार डॉ. दिलीप पाखरे यांना त्यांच्या साहित्य वर्धक कार्यासाठी शुभेच्छा म्हणून कोंकण मराठी साहित्य परिषदेच्या 35 व्या वर्धापन दिनी मालगुंड येथील कवी केशव स्मारक येथे प्रदान करण्यात आला, याप्रसंगी केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष श्री गजानन पाटील, सौ. दीपलक्ष्मी पाखरे, सौ. नमिता कीर, केंद्रीय अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद, कोषाध्यक्ष श्री प्रकाश दळवी, विश्वस्त श्री पाटील, रायगड, जिल्हाध्यक्ष श्री शेलार आणि मान्यवर उपस्थित होते.. डॉक्टर दिलीप पाखरे हे गेल्या सुमारे चाळीस ते पन्नास वर्षांपासून रत्नागिरी येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी साहित्यिक म्हणून ही आपला ठसा उमटवला आहे.. त्यांच्या अनेक कथा व कविता विविध दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या आहेत.. आणि याच पार्श्वभूमीवर त्यांच्या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या शुभ हस्ते प्रतिष्ठेचा सन्मान पुरस्कार डॉ. दिलीप पाखरे यांना त्यांच्या साहित्य वर्धक कार्यासाठी शुभेच्छा म्हणून कोंकण मराठी साहित्य परिषदेच्या 35 व्या वर्धापन दिनी मालगुंड येथील कवी केशव स्मारक येथे प्रदान करण्यात आला
