Home रत्नागिरी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास मौजे कुंभार खनी खुर्द गावनवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील श्री ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांचे राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूम मध्ये कुत्र्याचा पाठलाग करत असताना बिबट्या हा वन्यप्राणी अडकला असल्याची बातमी पोलीस पाटील कुंभारकणी खुर्द यांनी वन विभागास दिली

पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास मौजे कुंभार खनी खुर्द गावनवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील श्री ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांचे राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूम मध्ये कुत्र्याचा पाठलाग करत असताना बिबट्या हा वन्यप्राणी अडकला असल्याची बातमी पोलीस पाटील कुंभारकणी खुर्द यांनी वन विभागास दिली

0
पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास मौजे कुंभार खनी खुर्द गावनवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील श्री ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांचे राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूम मध्ये कुत्र्याचा पाठलाग करत असताना बिबट्या हा वन्यप्राणी अडकला असल्याची बातमी पोलीस पाटील कुंभारकणी खुर्द यांनी वन विभागास दिली

पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास मौजे कुंभार खनी खुर्द गावनवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील श्री ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांचे राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूम मध्ये कुत्र्याचा पाठलाग करत असताना बिबट्या हा वन्यप्राणी अडकला असल्याची बातमी पोलीस पाटील कुंभारकणी खुर्द यांनी वन विभागास दिली. मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन सर्व स्टाफसह साहित्यासह जागेवर जाऊन खात्री करता बाथरूम मध्ये कुत्रा व बिबट्या अडकला असल्याचे आढळून आले.

सदर वेळी वन विभागाने बाथरूमचा दरवाजा वरील बाजूस लाकडी फळयानी बंद करून पिंजरा लावला व बिबट्यास सुरक्षित रित्या पिंजऱ्यामध्ये घेतले त्यानंतर कुत्रा पण सुरक्षित बाथरुम मधुन बाहेर आला , सदर वन्य प्राणी बिबट्या याची पशुधन विकास अधिकारी श्रेणी 1 कडवई श्री सूर्यकांत बेलुरे यांचे कडून वैद्यकीय तपासणी करून घेतली . बिबट्या नर असून वय आठ ते नऊ वर्ष आहे, सदर वन्य प्राणी बिबट्या तंदुरुस्त असलेचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगीतले त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. सदर वेळी घटनास्थळी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी ,संगमेश्वर देवरुख ,श्री. न्हानू गावडे, वनरक्षक फुणगूस श्री आकाश कडूकर वनरक्षक साखरपा श्री. सहयोग कराडे , वनरक्षक दाभोळे श्रीमती सुप्रिया काळे, वनरक्षक आरवली श्री सुरज तेली वनरक्षक जाकादेवी श्रीमती शर्वरी कदम पोलीस पाटील कुंभारखणी खुर्द श्री रविंद्र महाडिक व ग्रामस्थ हे उपस्थित होते. सदरची कार्यवाही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421 741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाचे वतीने विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here