रत्नागिरीपारिजात संस्था मुंबईतर्फे कडवई किंजळकरवाडी शाळेत विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप

पारिजात संस्था मुंबईतर्फे कडवई किंजळकरवाडी शाळेत विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप

कडवई (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी – सामाजिक बांधिलकीतून कार्यरत असलेल्या पारिजात संस्था, मुंबई यांच्या वतीने बॅक टू स्कूल या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवई किंजळकरवाडी येथील विद्यार्थ्यांना रोजी शालेय किटचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, दप्तर, रबर, कंपास बॉक्स यासारखे शालेय साहित्य वाटण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा उपक्रम शाळेसाठी आनंदाचा क्षण ठरला.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री आनंद देशपांडे , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ रोहिणी किंजळकर तसेच पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारिजात संस्थेचे प्रतिनिधी म्हणाले की, “शिक्षणाचा हक्क सर्वांनाच आहे, त्यासाठी मूलभूत शालेय साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

शाळेच्या वतीने पारिजात संस्था, मुंबई यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. संस्थेच्या या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणात सहकार्य मिळाले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह व आत्मविश्वास वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास शाळेतील मुख्याध्यापक श्री. देशपांडे यांनी व्यक्त केला.
शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालकांनी पारिजात संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून अशा उपक्रमांची भविष्यातही पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Breaking News

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न…

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 22/09/2025

१) मंडणगड - 2.75 मिमी२) खेड - 44.85 मिमी३)...