राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी पाली गावातील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान ना. उदय सामंत ह्यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या मोफत सेवा देणाऱ्या डायलिसिस केंद्राची पाहणी केली. ना. उदय सामंत ह्यांनी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या कामाचा आढावा घेतला.
त्यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी रुग्णसेवेतील सुधारणा, सुविधा आणि स्थानिकांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेची गुणवत्ता याबद्दल माहिती घेतली. ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे डायलिसिस केंद्र महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी व्यक्त केला.
समर्पित सेवा देणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ना.उदय सामंत यांनी मनःपूर्वक आभार मानले.
