Home चिपळूण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा महिला मेळाव्याचे चिपळूणमध्ये आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा महिला मेळाव्याचे चिपळूणमध्ये आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा महिला मेळाव्याचे चिपळूणमध्ये आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा उत्तर व दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन चिपळूण येथे करण्यात आले होते

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी भूषवले. कार्यकारी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे तसेच दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ,या मेळाव्यासाठी चिपळूण शहराध्यक्ष शशिकांत मोदी तसेच महिला शहराध्यक्ष शितल रानडे संपूर्ण महिला मोर्चा यांच्या सहकार्याने हा मेळावा यशस्वीरित्या पार पडला.

जोरदार पावसाचे वातावरण असूनही महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. पावसाची तमा न बाळगता विविध भागांतून आलेल्या महिलांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.

या मेळाव्याचे प्रमुख वक्त्या प्रा. सौ. ज्योती तोरस्कर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानातून महिलांना सामाजिक योगदानाची प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, नेतृत्व विकास व समाजातील महिलांची भुमिका यावर चर्चा झाली. उपस्थित महिलांची संख्या आणि त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here