पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात रत्नागिरी येथील काँग्रेस आक्रमक-..
👉मागील काही दिवसांपासून सतत वाढत जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात रत्नागिरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अश्फाक काद्री यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना लेखी निवेदन देत दर वाढीचा निषेध केला आहे.. पेट्रोल डिझेल व गॅस चे वाढणारे दर म्हणजे एक प्रकारे महागाई ला निमंत्रण असल्याचे अश्फाक काद्री म्हणाले..
दरम्यान पेट्रोल डिझेल व गॅस ची दर वाढ कमी करण्यात आली नाही तर लवकरच आंदोलन केले जाईल असा इशारा रत्नागिरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अश्फाक काद्री यांनी दिला आहे.. अशफाक काद्री हे काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून रत्नागिरी शहरात काम करीत आहेत आणि ते महाराष्ट्रातील महायुती सरकार विरोधात विविध विषयांवर सतत आवाज उठवीतअसतात. अशफाक काद्री काँग्रेसचे रत्नागिरी शहराध्यक्ष असून ते सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करीत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे..
