रत्नागिरीप्रभाग १५ मधील सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी खुले; नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

प्रभाग १५ मधील सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी खुले; नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

प्रभाग १५ मधील सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी खुले; नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक १५ मधील आठवडा बाजार परिसरातील सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी खुले करण्यात आले. या शौचालयाचे उद्घाटन रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी मुख्याधिकारी वैभव गारवे भाजपाचे उपनगराध्यक्ष समीर तीवरेकर, भाजपच्या नेत्या तथा नगरसेविका वर्षाताई ढेकणे तसेच शिवसेना-भाजप महायुतीचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभागातील नागरिकांच्या स्वच्छता व मूलभूत सुविधांचा विचार करून हे सार्वजनिक शौचालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे आठवडा बाजार परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी मान्यवरांनी स्वच्छता राखण्याचे आवाहन करत अशा सुविधा टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही सांगितले.

प्रभागाच्या विकासासाठी अशा उपक्रमांना पुढेही चालना दिली जाईल, अशी भूमिका यावेळी नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे यांनी व्यक्त केली

Breaking News

आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; बेर्डेवाडी कालव्यासाठी ४ कोटींचा निधी मंजूर

आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; बेर्डेवाडी कालव्यासाठी...

रत्नागिरीत २४ मार्च रोजी ‘जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन’ आणि ‘फणस प्रक्रिया’ कार्यशाळा

रत्नागिरीत २४ मार्च रोजी 'जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन' आणि 'फणस...