रत्नागिरीप्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उप अधीक्षक मोजणीसाठी स्वतः शेतात

प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उप अधीक्षक मोजणीसाठी स्वतः शेतात

प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उप अधीक्षक नरेंद्र गोरे हे मोजणीसाठी स्वतः शेतात उतरले आहेत. माहे जानेवारी अखेर कोणतेही प्रकरण मुदतबाह्य राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.
जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागातील 3 महावर प्रलंबित असलेल्या मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी मोजणी करण्याची विशेष मोहीम जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. त्या अनुषंगाने उप अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी कार्यालयात एकूण 135 मोजणी प्रकरणे माहे जानेवारीअखेर मुदतबाह्य होणार असून, त्यापैकी 90 प्रकरणांची मोजणी पूर्ण होऊन ही मोजणी प्रकरणे कार्यालयीन कामावर प्रलंबित आहेत. उर्वरित मोजणी प्रकरणांपैकी 45 मोजणी प्रकरणांचा माहे जानेवारीमध्ये मोजणी कामी दौरा लावलेला आहे. शिल्लक राहणारी 19 मोजणी प्रकरणे 17 जानेवारी 2026 या सुट्टीच्या दिवशी मोजली जाणार आहेत. त्यासाठी कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी होणार असून माहे जानेवारी अखेर कोणतेही प्रकरण मुदतबाह्य राहणार नाही, असा विश्वास उप अधीक्षक नरेंद्र गोरे यांनी व्यक्त केलेला आहे.
तसेच या विशेष मोहिमेस पक्षकारांचे सहकार्य मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Breaking News