प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या अभियानाचे औपचारिक उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी ग्रामपंचायत पिसईचे सरपंच श्री. वसंत येसरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा भागवत, डॉ. वैदेही जोईल, विस्तार अधिकारी श्री. निलेश गिम्होनिकर यांच्यासह आरोग्य कर्मचारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्यविषयक तपासण्या, जनजागृती उपक्रम तसेच कुटुंबाच्या सशक्तीकरणासाठी विविध मार्गदर्शनपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महिलांचे आरोग्य सक्षम असेल तर परिवार व समाज सशक्त होईल हा संदेश या अभियानाद्वारे देण्यात आला.