रत्नागिरीफुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभारा...

फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभारा आणि गलथान कारभारा विरोधात चौकशी व कठोर कारवाई कारवाई व्हावी या मांगणी साठी दोन ऑक्टोबर रोजी डिंगणी उप सरपंच मिथुन निकम हे आमरण उपोषणाला बसणार असून

फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभारा आणि गलथान कारभारा विरोधात चौकशी व कठोर कारवाई कारवाई व्हावी या मांगणी साठी दोन ऑक्टोबर रोजी डिंगणी उप सरपंच मिथुन निकम हे आमरण उपोषणाला बसणार असून त्यांनी जनहितासाठी घेतलेल्या उपोषणाच्या निर्णयाला अनेक संघटना, संस्था, ग्रामपंचायत, आदींनी पत्राद्वारे तसेच भ्रमणध्वनीद्वारे संदेश पाठवून पाठिंबा दर्शवल्याने मिथुन निकम यांनी घेतलेल्या उपषण निर्णयाची धार अधिक तीव्र व्होऊ लागली आहे. फुणगूस दशक्रोशी तसेच डिंगणी पिरंदवणे आदी गावात खासगी औषधोपचाराचे साधन नसून, या भागातील जनतेला फुणगूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही. मात्र येथील आरोग्य केंद्र आणि त्याच्या कार्यक्षेत्रातील येणाऱ्या काही गावां मध्ये लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या उपकेंद्रीय कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभाराचा कहर, आणि गलथान कारभारामुळे येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या बरोबर येणाऱ्यांना अनेक त्रासदायक ठरणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविना आरोग्य केंद्राला कुलूप असल्याने अत्यावश्यक सेवा मिळवण्यासाठी रुग्णांची हेळसांड होते.या पूर्वी या ठिकाणी असलेली बायोमॅट्रिक यंत्रणा (हजेरी मशीन ) गायब असल्याने कर्मचाऱ्यांचे येण्याजाण्याच्या मनमानी वेळापत्रका मुळे अनेकदा रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे दुरापास्त होते. गाव वाडीपर्यंत आरोग्य सेवा व आरोग्य विषयक मार्गदर्शन पोहचवण्यासाठी काही गावात उपकेंद्र व ठिकाणी आरोग्य तसेच हिवताप चे कर्मचारी नेमणूक केले असून यांच्या कडून तर अधिक मनमानी सुरु आहे.यांच्या कडून फिरती आरोग्य सेवेचा तसेच उवकेंद्रात उपस्थित न राहण्याचा कारभार सुरु आहे. असा अंधाधुंदी कारभार सुरु असताना आरोग्य तसेच हिवताप चे तालुका व जिल्हा पर्यवेक्षक आरोग्य विषयक कामाची पाहणी व तपासणी करतात की नाही. असा प्रश्न साहजिकच उपस्थित करणारा आहे. आणि वरिष्ठठांचे जर लक्ष असेल तर तर असा अंधाधुंद कारभार चालतोच कसा हा सुद्धा यक्ष प्रश्न असून या अंधाधुंद कारभाराची मजल थेट लहान चिमुकल्या मुलांच्या जीवाशी खेळण्या पर्यंत पोहचली आहे. याला लगाम बसून रुग्ण जनतेला आरोग्य लाभ मिळावा यासाठी मिथुन निकम यांनी घेतलेल्या उपोषणाला काही संघटना, संस्था, राजकीय, सामाजिक पदाधिकारी, ग्रामपंचायत यांच्या कडून लेखी तसेच भ्रमणध्वनी द्वारे संदेश देऊन पाठींबा दिला जात असल्याने उपोषणाची धार अधिक तीव्र होऊ लागली आहे.

◾ रुग्ण जनतेसाठी पुरवल्या जणाऱ्या आरोग्य सुविधेचा लाभ येथील ढिसाळ आणि मनमानी कारभार मुळे समाधानकारक मिळत नाही. मनमानी कारभार करणाऱ्या येथील आरोग्य व हिवताप कर्मचाऱ्यांची चौकशी व कठोर कारवाईची संदर्भात उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाअधीकारी यांना दिले असून हा निर्णय मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून रुग्ण जनतेच्या हितासाठी घेतलेला माझा निर्णय असून मी घेतलेल्या उपोषण निर्णयाला अनेकांकडून लेखी तसेच मेसेज द्वारे पाठींबा देत असल्याने मी जनहितासाठी करत असलेल्या समाज कार्याला बळ मिळत असून मी पाठींबा देणाऱ्यांचा आभारी असल्याचे मिथुन निकम यांनी सांगितले.

Breaking News