कोकणबारावीच्या परीक्षेला झाली सुरवात…

बारावीच्या परीक्षेला झाली सुरवात…

कोकण बोर्डातून २४ हजार ५४२ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा–
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वाया लेखी परीक्षेला मंगळवार 11 फेब्रुवारी फेब्रुवारी पासून प्रारंभ झाली आहे.

ही परिक्षा 18 मार्च 2025 पर्यत चालणार आहे. या परिक्षेसाठी कोकण परिक्षा मंडळातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून 24 हजार 541 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) ची लेखी परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 38 तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 23 अशी एकूण 61 परिक्षा केंद्रे आहेत. त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयांची रत्नागिरीतील संख्या 163 तर सिंधुदूर्गमधील 89 इतकी कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातून 16 हजार 54 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 8 हजार 487 विद्यार्थी ही परिक्षा देणार आहेत.*

Breaking News