प्रथमतः दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मोटे सर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्यवाह श्री. समीर इंदुलकर यांच्या हस्ते नटराज पूजन आणि कै. रत्नाकर मतकरी सहित कै. सुधा करमरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सर्व निमंत्रित पाहुण्यांना गुलाब पुष्प आणि बालकवी लिखित काव्यसंग्रह पुस्तकरूपाने भेट देण्यात आला.
कार्यक्रमाला बालरंगभूमी परिषद शाखा रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर जुवेकर, कार्यवाह सीमा कदम, कोषाध्यक्ष शौकत गोलंदाज, कार्यकारिणी सदस्य तेजस्विनी जोशी, सल्लागार श्री. राजकिरण दळी, सभासद आणि युथ टीम सदस्य शहाबाज गोलंदाज, सागर सकपाळ, योगेश कदम, निरंजन सागवेकर, सई कदम आवर्जून उपस्थित होते.
उद्घाटनानंतर योगेश कदम लिखित आणि शहाबाज गोलंदाज दिग्दर्शित धोंड या बालनाट्याचे अभिवाचन करण्यात आले. यामध्ये अर्षती कारेकर, स्वरा कदम, ईशा चव्हाण, श्रेया गंधारे, सोहम कदम, श्रवण महाले, गंधार संसारे, श्रेया दसुरकर, अनन्या देवस्थळी आणि गार्गी या बालकलाकारांनी. सहभाग घेतला. या सर्व बाल कलाकारांना शाखेतर्फे काव्यसंग्रह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम सांगते नंतर उपस्थित बालप्रेक्षकांना सुका खाऊ देण्यात आला.