रत्नागिरीबाळासाहेब माने यांनी ही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत तटकरे यांची होणार...

बाळासाहेब माने यांनी ही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत तटकरे यांची होणार बिनविरोध निवड

*बाळासाहेब माने यांनी ही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत तटकरे यांची होणार बिनविरोध निवड–

👉मोठा गाजावाजा करून आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब माने यांनी ही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याने आता महायुतीचे उमेदवार अनिकेत सुनील तटकरे हे जवळपास बिनविरोध निवडून आल्यात जमा असल्याचे दिसून येत आहे.. बाळासाहेब माने यांनी अर्ज मागे घेताना मात्र आघाडीवरच ठपका ठेवला असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बाळासाहेब माने यांची मनधरणी सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली असल्याने त्यांच्या उपस्थितच त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान आता बाळासाहेब माने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहतात की पुढील काय दिवसात पुन्हा भाजपमध्ये जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

Breaking News