श्री. गणू बाबू करंबळे राहणार गवाणे यांचे काजू बागेमध्ये वन्य प्राणी बिबट फासकीमध्ये अडकले बाबत श्री. सुरेश तानाजी करंबळे राहणार गवाने यांनी भ्रमणध्वनी द्वारे कळवलेनुसार तात्काळ वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. सदर बिबट वन्य प्राण्याला लोखंडी पिंजऱ्यामध्ये सुरक्षित रित्या घेतले व त्याची पशुवैद्यकीय अधिकारी लांजा यांचेकडून तपासणी करून घेतली तो नर असुन अंदाजे दोन वर्ष वयाचा आहे तो सुस्थितीत असल्याची खात्री करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले
सदरची कार्यवाही ही श्रीमती गिरजा देसाई विभागीय वन अधिकारी (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती प्रियंका लगड सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रकाश सुतार वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी, श्री. राजेंद्र पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण राजापूर, श्री. न्हानू गावडे वनपाल पाली, श्री. महादेव पाटील वनपाल सामाजिक वनीकरण लांजा, श्री. विक्रम कुंभार वनरक्षक राजापूर, श्री. बाबासाहेब ढेकळे वनरक्षक सामाजिक वनीकरण लांजा, कु. श्रावणी पवार वनरक्षक कोरले, कु. नमिता कांबळे वनरक्षक लांजा, श्री. सिद्धार्थ हिमगिरे वनरक्षक, सामाजिक वनीकरण लांजा, श्री. चंद्रकांत रामाने वन मजूर व रेस्क्यू टीमचे श्री. दीपक कदम प्राणी मित्र, श्री. मंगेश महेश लांजेकर, श्री. मयुरेश आंबेकर, श्री. मंगेश आंबेकर व गवाणे गावचे इतर ग्रामस्थ यांनी पार पडली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने मा गिरीजा देसाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी यांनी केले.
श्री. प्रकाश सुतार
वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी
मो. नंबर ९४२१७४१३३५
