बेनगी वारिकवाडीच्या ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला जाहीर प्रवेश
राजापूर तालुक्यातील बेनगी येथील वारिकवाडी परिसरातील ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांचे स्वागत करत त्यांचा सन्मान केला. वारिकवाडीच्या ग्रामस्थांनी शिवसेना पक्षावर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा असून “वारिकवाडीने शिवसेना पक्षावर ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” असा शब्द आमदार किरण सामंत यांनी यावेळी दिला.
तसेच वारिकवाडी परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेली कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले.
या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनीही आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते विलास चालके, तालुकाप्रमुख दीपक नागले,पंचायत समिती सभापती नंदनी कदम,जिल्हा परिषद सदस्य कोमल नवाळे, राजू कुरूप, मुन्ना खामकर, सचिन भिंगारडे,विनोद शेलार प्रसाद गुरव, अजित बंडबे,रमेश वारिक मनोज आडिवरेकर,संतोष चव्हाण, राजन कोंडेकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
