राजकीयभाजपा परिवारात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी...

भाजपा परिवारात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत !

आपला भाजपा परिवार हा असा एकमेव पक्ष आहे, जो कार्यकर्त्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांच्या कर्तृत्वाला योग्य संधी देतो. भाजपा पक्ष संघटनेमध्ये कार्यकर्त्यांना मिळणारा सन्मान बघून अनेक समाजसेवी आणि राजकीय कार्यकर्ते आपल्या भाजपा परिवारात प्रवेश करत आहेत.
याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी तालुक्यातील शिवसेना (उबाठा) गटाचे उप तालुका प्रमुख राकेश साळवी, , बाजार समिती सदस्य संदीप सुर्वे, वॉर्ड क्र. ५चे शाखाप्रमुख दिपक गावडे, नाचणे उपविभाग प्रमुख दिनेश रेमुलकर, सचिव दिपक सुकल, शाखाप्रमुख दत्ता घडशी आणि शिवसैनिक श्रीकांत धनवकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे.

यावेळी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Breaking News