या बैठकीमध्ये ठाणे आणि रायगड, रत्नागिरी मधील विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आगामी ग्रामपंचायत, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने या दोन नेत्यांच्या चर्चेतुन काय बाहेर पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. रविद्रं चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्या नंतर महाराष्ट्रात मुंबई महानगर पालिकेसह अनेक महानगर पालिका. नगरपालीका.जिल्हा परिषदा.पचांयत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या भेटीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे..या बैठकीत कोणाला किती आणि कोणत्या जागा यावर चर्चा झाली असल्याचे समजते….
भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार व माजी मंत्री रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री डॉ उदय सामंत यांची बैठक आज प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या रायगड निवासस्थानी पार पडली.
