महाराष्ट्रभाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेशाच्या...

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होत आमदार आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होत आमदार आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.तसेच भाजपा जेष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी कल्याण जिल्हाध्यक्ष के आर जाधव, वयोवृद्ध मार्गदर्शक बापूसाहेब मोकाशी यांचे ही आशीर्वाद घेतले.
राज्याच्या काना कोपऱ्यात भाजपा विचारधारेची पाळेमुळे आणखी बळकट करण्याचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी शुभाशीर्वाद आणि बळ द्यावे, हीच गणरायाचरणी प्रार्थना असे नवनिर्वाचित भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले… उद्या 1 जुलै रोजी रवींद्र चव्हाण यांच्या नावांची अधिक अधिकृत प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात येईल.. रवींद्र चव्हाण हे भाजपचे एक ज्येष्ठ नेते तर आहेतच परंतु सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केले आहे तसेच एक चांगले संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित भाई शाह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रवींद्र चव्हाण हे मर्जीतले नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्या निवडीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे…

Breaking News

आजीची रानभाजी बहुउपयोगी आणि पौष्टिक शेवगा

रेषेदार लांब शेवग्याच्या शेंगा सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. याला मोरिंगा,...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 25/07/2025

१) मंडणगड -54.50. मिमी२) खेड - 96.71 मिमी३) दापोली...