रत्नागिरीभाताची ओळ पद्धतीने लागवड प्रात्यक्षिक उत्साहात संपन्न

भाताची ओळ पद्धतीने लागवड प्रात्यक्षिक उत्साहात संपन्न

भाताची ओळ पद्धतीने लागवड प्रात्यक्षिक उत्साहात संपन्न

वाहळ (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी):गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयतील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत “कृषी अस्तित्व” या विद्यार्थी गटामार्फत वाहळ गावात भाताची ओळ पद्धतीने लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.

या प्रात्यक्षिकासाठी प्रगतिशील शेतकरी श्री. नंदकुमार मोरे यांनी आपले शेत उपलब्ध करून दिले. कार्यक्रमास ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे एस.एम.एस. प्रा. विघ्नेश सकपाळ तसेच ए. इ.एस. प्रा. प्रशांत इंगवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी प्राध्यापकांनी शेतकऱ्यांना भाताची ओळ पद्धतीने लागवड करण्याचे फायदे, योग्य अंतर राखण्याचे महत्त्व, उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच खर्चात बचत करण्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक भात लागवड तंत्रज्ञानाची माहिती मिळाली असून त्यांनी या पद्धतीचा अवलंब करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शेतकरी श्री. नंदकुमार मोरे तसेच उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

हा संपूर्ण उपक्रम कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी आणि ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...