संगमेश्वरभारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार श्री रविंद्र चव्हाण यांच्या...

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार श्री रविंद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून कोकणात एसटीचा प्रवासी थांबा बांधणे हा उपक्रम सुरू असताना देवळे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी अंतर्गत राजापूर लांजा साखरपा विधानसभा क्षेत्र तसेच तळेकांटे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी अंतर्गत रत्नागिरी विधानसभा क्षेत्र या दोन्ही ठिकाणी एसटीच्या प्रवासी थांब्याचे लोकार्पण

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार श्री रविंद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून कोकणात एसटीचा प्रवासी थांबा बांधणे हा उपक्रम सुरू असताना देवळे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी अंतर्गत राजापूर लांजा साखरपा विधानसभा क्षेत्र तसेच तळेकांटे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी अंतर्गत रत्नागिरी विधानसभा क्षेत्र या दोन्ही ठिकाणी एसटीच्या प्रवासी थांब्याचे लोकार्पण भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ शिल्पाताई मराठी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले .सदर कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरीचे महामंत्री श्री अमित केतकर , रत्नागिरी मध्य मंडल अध्यक्ष श्री. प्रतीक देसाई उपस्थित होते. आणि त्या त्या भागातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी अनुक्रमे श्री प्रबोध आठल्ये , देवळे सरपंच सौ.कोरगावकर मॅडम,माजी सरपंच मॅडम,श्री. गंगाराम केसरकर,सौ. आठल्ये सौ नपुरा मुळे, तळेकांटे गावच्या भारतीय जनता पार्टीच्या सरपंच सौ बने श्री संदीप बने श्री बाबा बने श्री राजेश आंबेकर श्री करकरे काका श्री विवेक आठल्ये आणि दोन्ही गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत साहेब आज कार्यबाहुल्यामुळे अनुपस्थित होते मात्र त्यांनी मेसेज द्वारे ह्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.ग्रामस्थांनी श्री चव्हाण साहेब राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारच्या उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली एसटीच्या प्रवासी थांबा नूतनीकरण विषयात सौ . शिल्पाताई मराठे यांचे विशेष योगदान असल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांतर्फे गौरव करण्यात आला आणि त्यांना धन्यवाद देण्यात आले.

Breaking News