रत्नागिरीभारतीय सैन्याच्या सन्मानार्थ रत्नागिरीत शनिवारी निघणार तिरंगा रॅली‌……

भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ रत्नागिरीत शनिवारी निघणार तिरंगा रॅली‌……

रत्नागिरी : पहेलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबविण्यात आली या मोहिमेतील देशातील सैन्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ शनिवार *दि 17 मे रोजी सायंकाळी 5.30 *वाजता* मारुती मंदिर ते जयस्तंभ मार्गावर तिरंगा*
रॅली काढण्यात येणार आहे.या रॅलीमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ उदय सामंत.जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले..
या रॅलीच्या नियोजना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी राजवर्धन करपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी आदी उपस्थित होते.

Breaking News