रत्नागिरीभारत बनेल AI सुपरपॉवर ? १० लाख कोटींची रिलायन्सची गुंतवणूक

भारत बनेल AI सुपरपॉवर ? १० लाख कोटींची रिलायन्सची गुंतवणूक

मुकेश अंबानी यांनी भारत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मोठी घोषणा करत देशाच्या तंत्रज्ञान भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि Jio मिळून पुढील सात वर्षांत एआय क्षेत्रात तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ही गुंतवणूक केवळ व्यावसायिक विस्तारासाठी नसून भारताला एआय महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने असल्याचे अंबानी यांनी स्पष्ट केले. अंबानी यांनी सांगितले की, जिओने देशात इंटरनेट आणि डेटा स्वस्त करून डिजिटल क्रांती घडवली. त्याच धर्तीवर आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानही परवडणाऱ्या दरात भारतीयांसाठी उपलब्ध करून दिले जाईल*
. भारत एआय भाड्याने घेणारा देश राहणार नाही, तर स्वतःची एआय क्षमता विकसित करणार, असे ते म्हणाले. इंटरनेट युगानंतर आता “इंटेलिजन्स इरा” आणण्याचा संकल्प जिओने केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिओ एआय भारतीय भाषांमध्ये कार्य करेल, ही या उपक्रमाची मोठी वैशिष्ट्ये ठरणार आहेत. शेतकरी, विद्यार्थी, तरुण उद्योजक आणि लघु व्यावसायिकांना त्यांच्या मातृभाषेत एआयचा वापर करता यावा यासाठी ही रचना करण्यात येत आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र एआय प्लॅटफॉर्म विकसित केले जाणार आहेत. ‘Education AI’, ‘Health AI’, ‘Agri AI’ आणि ‘Bharat IQ’ सारखे प्लॅटफॉर्म स्थानिक भाषांमध्ये एआय-आधारित उपाय उपलब्ध करून देतील. या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील डिजिटल दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग म्हणजे गुजरातमधील जामनगर येथे उभारण्यात येणारा मल्टि-गीगावॅट एआय-रेडी डेटा सेंटर पार्क. टप्प्याटप्प्याने विकसित होणाऱ्या या प्रकल्पाची सुरुवात २०२६ च्या अखेरीस १२० मेगावॅट क्षमतेसह होणार आहे. पुढील काळात याची क्षमता गीगावॅट स्तरापर्यंत वाढवली जाईल. विशेष म्हणजे हा डेटा सेंटर पार्क पूर्णपणे ग्रीन एनर्जीवर आधारित असेल. अक्षय ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकासाला चालना मिळणार आहे. या सुविधेमुळे शाळा, रुग्णालये, किरकोळ दुकाने आणि कृषी क्षेत्रासाठी एआय-आधारित सेवा जलदगतीने उपलब्ध होतील.
अंबानी यांनी विश्वास व्यक्त केला की २१व्या शतकात भारत एआय शक्तीकेंद्र बनेल. मात्र त्यासाठी एआय तंत्रज्ञान सुलभ, स्वस्त आणि वापरण्यास सोपे असणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधा, डेटा सेंटर आणि स्थानिक भाषांतील प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारताची एआय क्षमता स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही सट्टेबाजी नसून दीर्घकालीन राष्ट्रीय बांधिलकी असल्याचे अंबानी यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे देशात रोजगारनिर्मिती, नवोन्मेष आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एआयच्या क्षेत्रात मोठी मुसंडी मारण्याच्या तयारीत असलेल्या रिलायन्स-जिओ समूहामुळे भारताच्या तंत्रज्ञान नकाशावर एक नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत

Breaking News