शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते करावे म्हणून पत्र दिले असले तरी अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सहजासहजी लवकर निर्णय घेतील याबाबत अनेकांना शंका वाटत आहे. त्यांच्या दृष्टीने आमदार आदित्य ठाकरे यांना जर का विरोधी पक्ष नेतेपद दिले असते तर लगेच मंजूरी दिली असती परंतु आमदार भास्कर जाधव हे आक्रमक शैलीचे नेते म्हणून ओळखले जात असल्याने ते विरोधी पक्ष नेते पदावर बसल्यास सत्तारूढ पक्षाला हैराण करू शकतात त्यामुळे जरी उद्धव ठाकरे यांनी पत्र दिले असले तरी विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय घेतील असे वाटत नाही— मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने कडून कोकणात ऑपरेशन टायगर राबवण्यात येत आहे आणि त्यामध्ये आमदार भास्कर जाधव यांचा ही नंबर होता अशी चर्चा सुरू होती.आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद देण्यासाठी लेखी पत्र दिले असल्याने आज तरी ऑपरेशन टायगर मोहीम थंडावली असल्याचे बोलले जात आहे—
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.