Home रत्नागिरी महाड नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांची शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आज भेट घेतली.

महाड नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांची शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आज भेट घेतली.

0
महाड नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांची शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आज भेट घेतली.

महाड नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांची शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आज भेट घेतली. त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी विजयी उमेदवारांसमवेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींना मानाचा मुजरा केल्यानंतर, संविधानाचे निर्माते महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. रोहिदास हॉल महाड येथे आयोजित विजय सोहळ्यात मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन व सन्मान करुन, त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

यावेळी रोहयो मंत्री ना.भरतशेठ गोगावले, जिल्हाध्यक्ष श्री.प्रमोदशेठ घोसाळकर, नवनियुक्त नगराध्यक्ष श्री.सुनिल बाविस्कर, नगरसेवक श्री.निखिल शिंदे, श्रीमती विद्या देसाई, श्री.दिपक चव्हाण, श्रीमती गायत्री बाविस्कर, श्रीमती मीनल जाधव, श्रीमती पूजा गोविलकर, श्रीमती पालवी गोळे यांच्यासह जिल्हा समन्वयक श्री.राजेश देशमुख, पदाधिकारी श्री. विजय रोकडे, श्री.सुरेश महाडीक, श्री.विजय सावंत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here