संगमेश्वरमहामार्ग ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे संगमेश्वर येथे वडाचे वृक्ष जमीनदोस्त होऊन महावितरणचे खांब...

महामार्ग ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे संगमेश्वर येथे वडाचे वृक्ष जमीनदोस्त होऊन महावितरणचे खांब वाकले, विजवाहिन्या तुटल्या…

महामार्ग ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे संगमेश्वर येथे वडाचे वृक्ष जमीनदोस्त होऊन महावितरणचे खांब वाकले, विजवाहिन्या तुटल्या…

मोठी हानी टाळली असली तरी तीन गावातील विजप्रवाह खंडीत.व्यापऱ्यांचे आर्थिक नुकसान.

संगमेश्वर /एजाज पटेल 

संगमेश्वर येथे मुंबई -गोवा राष्ट्रीय महा मार्गावर असलेल्या पारेख पेट्रोल पंपा पासून अगदी जवळ अंतरावर भलेमोठे वडाचे वृक्ष जमीनदोस्त झाले.यावेळी महा वितरणचे अकरा किलोओल्ट विजवाहिन्या ओडण्यात आलेले सहा खांब वाकल्याने व विद्युतभारीत वाहिन्या तुटून पडल्याने  पारेख पेट्रोलपंप परिसर, मापारी मोहल्ला, कोंड असुर्डे, मौजे असुर्डे या गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. महामार्ग ठेकेदाराच्या जाणीवपूर्वक हलगर्जी पणामुळे हा सर्व प्रकार झाला असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असून संगमेश्वर पारेख पेट्रोल पंपा जवळ महामार्गा लगत असलेल्या भल्या मोठ्या वडाच्या वृक्षाचे ठिकाणची माती खोदाई करून त्या वृक्षाचे जमिनीत पसरलेली खोडे जेसीबी च्या साहाय्याने तोडून  ठेकेदार कंपनीच्या कामगारांनी कापली. या मुळे हा  वृक्ष अधांतरी उभा होता. त्यामुळे हा वृक्ष केव्हाही जमीनदोस्त होईल आणि मोठी दुर्घटना होऊ शकेल याची कल्पना त्याचवेळी ठेकेदार कंपनीच्या कामगारांना  तसेच त्यांच्या वरिष्ठांना देण्यात आली मात्र त्यांनी  जाणीवपूर्वक लोकांच्या सूचनेकडे पाठ फिरवली.दोन दिवस अवकाळी पावसाचा हैदोस सुरु असून वृक्ष कोसळला तर या विचारात आणि भीतीच्या वातावरणात लोक वावरत होते. मात्र याचे कोणतेच सोयरसुतक ठेकेदार कंपनीला नव्हते. ते जनू दुर्घटना व जीवितहानी होण्याच्या प्रतीक्षेतच होते.
सा. बां. विभाग कार्यकारी अभियंतांना साद

काळ पासून संगमेश्वर भागात जोरदार वाऱ्यसह अवकाळी पावसाचे थैमान सुरु असून महामार्गा च्या अगदी लगत असलेल्या अधांतरी उभ्या असलेल्या वृक्षा पासून संभाव्य धोका आहे. आणि तसे झाल्यास महावितरण ची तर हानी होईलच यात शंकाच नाही मात्र महामार्गावरील वाहानांवर वृक्ष किंव्हा विजवाहिन्या पडल्यास न भरून येणारी हानी होऊ शकेल हे सत्य नाकारून चालणार नसल्याने याची माहिती सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता यांना मोबाईल वरून बुधवारी सकाळी देण्यात आली.

त्यांनी गुरुवारी ते वृक्ष तोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ठेकेदारचा मनमानी कारभार निसर्गालाही चव्हाट्यावर आणायचे होते म्हणूनच की काय विश्रांती घेतलेल्या पावसाने  बुधवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह  थैमान घालताच तो  वृक्ष जोरदार आवाज करत  अखेर जमिनीवर आडवा झाला. यावेळी त्याने अकरा किलोओल्ट विजवाहिन्या सहित सहा विद्युत खांबांना सुद्धा जमिनीला नतमस्तक होण्यास भाग पाडून लोकांच्या मनातील अंदाज खरा ठरवून दाखवला.

मात्र हा सर्वप्रकार घडत असताना सुदैव एवढेच म्हणावे लागेल महामार्गावर वाहनांची तसेच आजूबाजूला मानवी वर्दल नसल्याने कोणतीही मोठी दुर्घटना वा कोणतीही जीवित हानी झाली नाही. महावितरण विभागाला मात्र  याचा आर्थिक फटका बसला आहे. तर संगमेश्वर मधील काही भागासह कोंड असुर्डे व मौजे असुर्डे गावातील लोकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.तर विजेअभावी व्यापाऱ्यांना आर्थिक फटका पतकरावा लागला.

महामार्ग ठेकेदाराने जनतेच्या जीवाशी खेळण्याचा ठेका घेतला आहे का
येथील महामार्ग ठेकेदार कंपनी संगमेश्वर येथील जनतेच्या जीवाशी जीवघेणा खेळ खेळण्याचा प्रकार नेहमीच करत असल्याने जनता कमालीची संतप्त झाली असून, त्याच्या विरोधात लवकरच आक्रमक पवित्रा घेणार असल्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Breaking News

Play Through Free Spins Without Wasting Winnings

Play Through Free Spins Without Wasting WinningsPlay Through Free...

Fungerer Churchill-systemet faktisk i Balloon?

Fungerer Churchill-systemet faktisk i Balloon?Churchill-systemet i Balloon ser robust...