महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदय सामंत ह्यांनी नवी दिल्ली दौऱ्यावर असताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषणजी गवई यांची सदीच्छा भेट घेतली.
भारतीय न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान असलेल्या मराठी सुपुत्राशी झालेला हा संवाद अत्यंत प्रेरणादायी ठरला असे मत ना.उदय सामंत यांनी व्यक्त केले
मा.सरन्यायाधीश यांचं मार्गदर्शन आणि अनुभव निश्चितच सार्वजनिक जीवनात मोलाचं ठरणार आहे, असे ही ना. उदय सामंत ह्यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी राहुल पंडित, बिपीन बंदरकर, निमेश नायर, सचिन सावंत, दीपक पवार आदी उपस्थित होते.