महाराष्ट्रमहाराष्ट्रातील ह्या पाच शहरांतील विद्यार्थ्यांनी दांडी मारणं पडेल महागात ! शाळा-महाविद्यालयांत बायोमेट्रिक...

महाराष्ट्रातील ह्या पाच शहरांतील विद्यार्थ्यांनी दांडी मारणं पडेल महागात ! शाळा-महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी–

राज्य सरकारने आता सर्व शाळा आणि महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी लागू केली असून 75% हजेरी अनिवार्य असणार आहे. यामुळे शाळा – कॉलेज मध्ये जाणे गरजेचे होणार आहे,शैक्षणिक वर्ष 2025 पासून हा निर्णय लागू होईल.*
येत्या शैक्षणिक वर्षापासून ७५ टक्के हजेरी अनिवार्य केली जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात नियमितपणे उपस्थित राहण्याची गरज भासणार आहे.
नव्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी
२०१८ मध्ये राज्य सरकारने महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक माध्यमातून नोंदवली जाईल. या पद्धतीचा उद्देश विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला वाढवणे आणि शाळा महाविद्यालयांमध्ये शिस्त राखणे हा होता. कोरोनाच्या काळात या पद्धतीची अंमलबजावणी करता आली नाही, परंतु आता सरकारने नव्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरवातीला मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या पाच शहरांमधील महाविद्यालयांमध्ये या पद्धतीची अंमलबजावणी केली जाईल. विशेषत: विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी लागू केली जाईल. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात नियमितपणे उपस्थित राहण्याची प्रेरणा मिळेल.
बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू केल्याने विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळा-महाविद्यालयात उपस्थित राहण्याची प्रेरणा मिळेल. महाविद्यालयांच्या माथी खर्चाची जबाबदारी असली तरी, हा निर्णय शाळेतील शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करेल.

Breaking News