महाराष्ट्रमहाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण !

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण !

दसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेड (RAL) यांची ऐतिहासिक भागीदारी…

नागपूर येथे फाल्कन 2000 बिझनेस जेट्सचे उत्पादन होणार..

पॅरिस एअर शोमध्ये दसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची सहाय्यक कंपनी RAL यांनी ऐतिहासिक भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारी मुळे फ्रान्सच्या बाहेर प्रथमच फाल्कन 2000 बिझनेस जेट्सचे उत्पादन भारतात होणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील नागपूर येथे अत्याधुनिक फायनल असेंब्ली लाइन स्थापन केली जाणार आहे.

ही भागीदारी भारताच्या एरोस्पेस क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. भारताचा आता अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, आणि ब्राझीलच्या पंक्तीत समावेश होणार असून जागतिक स्तरावर बिझनेस जेट्स निर्माण करणाऱ्या देशांमध्ये स्थान भारताला स्थान मिळणार आहे.
2028 पर्यंत ‘मेड इन इंडिया’ फाल्कन 2000 जेट्स कॉर्पोरेट आणि मिलिटरी वापरासाठी सज्ज होतील. याशिवाय DRAL ही Falcon 6X आणि 8X साठी Center of Excellence म्हणून कार्य करणार असून, भारतातील एव्हिएशन उत्पादन क्षमतेला भक्कम आधार ठरणार आहे.
या ऐतिहासिक प्रकल्पामुळे महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. या भागीदारीमुळे भारताचे जागतिक एरोस्पेस हब म्हणून स्थान अधिक बळकट होणार आहे.

“दसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स यांच्यातील ही ऐतिहासिक भागीदारी म्हणजे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमतेला मिळालेला जागतिक दर्जाचा सन्मान आहे. मी या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे मन:पूर्वक आभार मानतो. त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळेच आज महाराष्ट्र हे जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनत आहे. हा प्रकल्प ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना मूर्त रूप देणारा आहे.”असे मत मराठी भाषा व उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉ उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे

Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 19/06/2025

१) मंडणगड - 95.00 मिमी२) खेड - 67.85 मिमी३)...

🏏नायरी गावाचा सुपुत्र झैद नफील पाटणकर याची मुंबई संघातून इंग्लंड दौऱ्यासाठी निवड ..झैद मध्यमगती गोलंदाज!

संगमेश्वर तालुक्यातील नायरी गावाचा उदयोन्मुख क्रिकेटपटू झैद नफील पाटणकर...