महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन , मनसे तालुका अध्यक्ष रत्नागिरी श्री.रुपेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत, मनसे शहर संघटक रत्नागिरी श्री.अमोल श्रीनाथ यांच्या नेतृत्वात, उपशाखा अध्यक्ष प्रसाद भाटकर यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी शहरातील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. सदर पक्षप्रवेश हा रत्नागिरी शहरातील मनसे पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे असे मनसे शहर संघटक अमोल श्रीनाथ यांनी बोलतांना सांगितले. त्यावेळी चंदन शिवलकर, नितीश पाटील, वेदराज मयेकर, तेजस बेर्डे, पार्थ नागवेकर, नंदादीप मोरे, यांसमावेत अनेक तरुणांनी मनसेत पक्षप्रवेश केला.सदर पक्षप्रवेशा दरम्यान रत्नागिरी शहरातील काही पदनियुक्त्या ही पार पडल्या. प्रसाद भाटकर यांची उपशाखा अध्यक्ष तर गौरव खेडेकर यांची उपविभागअध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली. आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, शहर संघटक अमोल श्रीनाथ मनसे महिला उपशहर अध्यक्षा सौ. द्वारका ताई नंदाने, तालुका सचिव अभिलाष पिलणकर, उपशहर अध्यक्ष राहुल खेडेकर, उपशहर अध्यक्ष राजेश नंदाने, विभाग अध्यक्ष अक्षय सुतार, विभाग अध्यक्ष सोहम पिलणकर, विभाग अध्यक्ष संजय आग्रे, विभाग अध्यक्ष आकाश फुटक तसेच ईतर महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.