महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बारामती दौऱ्यावर येत असताना त्यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. यानिमित्ताने कणकवली येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजिदादा पवार यांना आदरांजली देण्यात आली.
पालकमंत्री ना. नितेश राणे –
अजितदादा जिल्ह्यात येणार किंवा दौरा लागलेला आहे. हे कळले की आमची धावपळ असायची. आणि आता त्यांचा हस्ती कलश जिल्ह्यात येतो ही मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे. ते जेव्हा होते तेव्हा त्यांची किंमत कळलेली नव्हती. मात्र आता ज्या भावना व्यक्त केल्या जात आहे त्याचावरून त्या माणसाने महाराष्ट्र साठी काय केलं हे लक्षात येत. अजित दादा पवार यांच्यासारखा माणूस पुन्हा होणे नाही. अजिदादांमध्ये जि ऊर्जा होती ती जबरदस्त होती. ६ वाजता सकाळी उठून पहिली मिटिंग घ्यायचे. महाराष्ट्रावर त्यांचं वेगळं प्रेम होतं. महाराष्ट्र ला प्रगतशील राज्य बनवण्याच प्रयत्न होता. सरकार मध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली. २०१४ ते १९ मध्ये काँग्रेस मध्ये आमदार होतो. राष्ट्रवादी चे नेते असल्याने त्यांना अतिशय जवळून पाहिलं. त्यांच्या कामाची पद्धत जवळून पाहिलं. अधिकाऱ्यांकडून कोणतंही काम करून घेण्याचा कौशल्य होत. शिवसृष्टीसाठी अजित दादांनी अथक प्रयत्न केले. सरकारच्या प्रकल्पात जर कोणी मदत करत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे या विचारांचे दादा होते. सी वर्ल्ड प्रकल्पसाठी पहिले १०० कोटी अजितदादांनी दिले. विकासासोबत तडजोड करायची नाही, हे अजितदादांनी शिकवले. कुटुंबियांना वेळ न देता २४ तास महाराष्ट्रसाठी राबायचे. दादा जेव्हा होते तेव्हा त्यांचं कौतुक कोणी केलं नाही, दादांनी आपल्यासाठी काय केलं, हे शोषल मीडियावर दिसंत आहे. माणूस गेल्यावर किंमत आपल्याला कळत असेल तर त्याला अर्थ नाही. शरद पवार साहेबांचे पुतणे असले तरी दादांनी राज्यात एक वलय निर्माण केलं. ते जेव्हा राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून पुढे आले तेव्हा त्यांचे आमदार कुठेही लपवण्याची वेळ आली नाही. घटनेची माहिती कळल्यावर जि गर्दी उसळली ती त्यांच्या कामाची पोच पावती आहे. राजकारणाशी देणंघेणं नाही अशानी देखील स्टेटस ठेवले हीच त्यांच्या कामाची ओळख होती.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बारामती दौऱ्यावर येत असताना त्यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. यानिमित्ताने कणकवली येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
